राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत पालीच्या डी. जे. सामंत प्रशालेला चार सुवर्ण पदाकांसह एकूण ८पदके

गोवा येथे झाली राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप 2022 स्पर्धा

रत्नागिरी : गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेमध्ये पाली येथील डी. जे. सामंत इंग्लिश मिडीयम स्कूल या प्रशालेने नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. यामध्ये एकूण चार गोल्ड मेडल, एक सिल्व्हर मेडल आणि तीन ब्राँझ मेडल या पदकांवर विद्यार्थ्यांनी आपले नाव कोरले.


रुद्र विलास कासारे (इयत्ता : सहावी), आरूष अमोल खाकम (इयत्ता : चौथी), शौर्य अमोल सावंत (इयत्ता : तिसरी) यांना गोल्ड मेडल, तर श्रीनंदन उत्तम वेदांते (इयत्ता : तिसरी) याने सिल्व्हर मेडल आणि ध्यान हितेश पटेल (इयत्ता : सहावी), हर्ष संदेश कांबळे (इयत्ता : सहावी), युग संतोष तारवे (इयत्ता : तिसरी), ईश्वरी सचिन शिंदे (इयत्ता : तिसरी) या विद्यार्थ्यांना ब्राँझ मेडल प्राप्त झाले आहे. या विद्यार्थ्यांना कराटे शिक्षक श्री. साळुंके सर आणि श्रीम. साळुंके मॅडम यांचे उपयुक्त असे मार्गदर्शन लाभले.

सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री. आर. डी. सामंत तथा अण्णा सामंत आणि मातृतुल्य आदरणीय सामंत काकी यांनी शुभेच्छापर कौतुक केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नूतन कांबळे मॅडम तसेच सर्व सहकारी शिक्षकवृंद यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना सदिच्छा देण्यात आल्या.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE