हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी रत्नागिरीत ३ डिसेंबरला जागृती सभा

विनोद गादीकर, हिंदु जनजागृती समिती यांची माहिती

रत्नागिरी : भारताच्या संविधानात प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता आणि न्याय मिळेल, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात आपल्या देशात अल्पसंख्य आयोग, सच्चर आयोग, अल्पसंख्याक विकास मंत्रालय आहे; मात्र बहुसंख्य हिंदूंना कोणतेही संरक्षण देणारे मंत्रालय आयोग नाही. देशभरात केवळ हिंदूच्याच मंदिरांचे सरकारीकरण, तर मशिदी चर्चचे सरकारीकरण का नाही ? हिंदूच्या हजारो युवतींना उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद म्हणजे ‘लव्ह जिहाद. भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे संकट हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूवर होणाऱ्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ डिसेंबर २०२२ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मारुती मंदिर येथे सायंकाळी ५:०० वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक श्री विनोद गादीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.


या प्रसंगी श्री. विनोद गादीकर पुढे म्हणाले, “या सभेत सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाइये, हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाइये, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर हे वक्ते सभेत मार्गदर्शन करणार आहेत. या सभेच्या ठिकाणी क्रांतीकारकांबद्दल माहिती देणारे फलक, हिंदूंना प्रतीदिन करावयाच्या धर्माचरणाच्या कृती, साधना यांविषयी मार्गदर्शन करणारे फलक प्रदर्शन, तसेच हिंदूमध्ये जागृती करणाऱ्या ग्रंथांचे अन् हिंदूना धर्मशिक्षण देणाऱ्या विविध ग्रंथाचे प्रदर्शनही लावण्यात येणार आहे. तसेच स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात येणार आहेत.
यावेळी गोसेवा संघ ता.जि. रत्नागिरीचे अध्यक्ष व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. गणेश गायकवाड म्हणाले की, “हिंदु जनजागृती समिती गेली २० वर्षे हिंदु राष्ट्र जागृतीचे कार्य करत आहे. भारत हे हिंदु राष्ट्र राहिले पाहिजे. धर्मजागृतीच्या या कार्याची अत्यंत आवश्यकता असून या सभेसाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मी करतो.”
गोसेवा संघ ता.जि. रत्नागिरीचे उपाध्यक्ष व हिंदू राष्ट्र सेनेचे श्री.चंद्रकांत राऊळ म्हणाले की, अल्पसंख्याकांना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान, मग बहुसंख्य हिंदूनी काय अपराध केला आहे ? हे सर्व पहाता भारतात खरोखरच ‘सेक्युलर’ व्यवस्था अस्तित्वात आहे का ?, असा प्रश्न निर्माण होतो.
या प्रसंगी सनातन संस्थेचे श्री. महेंद्र चाळके, हिंदु जनजागृती समितीचे श्री.संजय जोशी यांनी हिंदूनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन केले.
सभेसाठी रत्नागिरी शहर परिसरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रसार चालू असून गेले महिनाभर विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. कोपरा बैठका यांसमवेत भित्तीपत्रके, हस्तपत्रके, फलकलेखन, होर्डिंग, सामाजिक संकेतस्थळ यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे. अनेक युवक धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित करत आहेत.


या सभेच्या प्रचारासाठी ३० नोव्हेंबर २०२२ या दिवशी मारुती मंदिर (आरंभ) रामआळी-गोखलेनाका कॉंग्रेस भवन-टिळक आळी झाडगाव नाका राणी लक्ष्मीचौक- गोखले नाका मारुती आळी – जयस्तंभ (सांगता) या मार्गावर सायं. ४.०० ते सायं. ६०० या वेळेत वाहनफेरी काढण्यात येणार आहे. या फेरीत हिंदूंनी सहभागी व्हावे, तसेच शनिवार, ३ डिसेंबर २०२२ या दिवशी सायं. ५:०० वा. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम येथे होणाऱ्या सभेसाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. विनोद गादीकर यांनी केले आहे.

या संदर्भात अधिक माहितीसाठी श्री. विनोद श्रीनिवास गादीकर, (संपर्क क्रमांक 9422050560) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE