कोकण रेल्वे मार्गावर ९ डिसेंबरपासून धावणार ‘विंटर स्पेशल एक्सप्रेस’


रत्नागिरी : लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूरु तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव अशा दोन विंटर स्पेशल गाड्या कोकण रेल्वे धावणार आहे. कोकण रेल्वे कडून या गाड्यांची घोषणा शुक्रवारी रात्री केली आहे.


लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूरु (01453/01454) ही साप्ताहिक एक्सप्रेस दि. दिनांक नऊ डिसेंबर ते ६ जानेवारी 2023 या या कालावधीत दर्शक्रवारी धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस वरून ही गाडी रात्री सव्वा दहा वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी ती मंगळुरू जंक्शनला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मंगळुरू दिनांक दहा डिसेंबर 2022 ते 7 जानेवारी 2023 या कालावधीत दर शनिवारी धावेल. ही विंटर स्पेशल मंगळूर येथून सायंकाळी 6:45 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला ती दुसऱ्या दिवशी दुपारी 2.45 वाजता पोहोचेल.
ही गाडी पनवेल रोहा खेड चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी, कणकवली सिंधुदुर्ग कुडाळ सावंतवाडी थिविम करमाळी मडगाव कारवार मार्गे मंगळूरूला जाईल.


दुसरी विंटर स्पेशल एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणार आहे. ही गाडी(01455/01456) दिनांक १ जानेवारी 2023 रोजी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता ते मडगाव ला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी मडगाव येथून सकाळी साडेअकरा वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री पावणे बारा वाजता ती मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनस ला पोहोचेल.

या विंटर स्पेशल एक्सप्रेसला ठाणे पनवेल रोहा माणगाव खेड चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी राजापूर वैभववाडी कणकवली, सिंधुदुर्ग कुडाळ सावंतवाडी थिविम हे थांबे देण्यात आले आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE