तालुकाध्यक्ष विवेक शेरेंनी केला बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

देवरूख( सुरेश सप्रे) : संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व नावडीचे सरपंच विवेक शेरे यांनी हातातील घड्याळ उतरवत ढाल तलवार घेतली हाती घेतल्याने तालुका राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे..
राज्यात आमचे महा विकासआघाडीचे सरकार असताना सामान्य जनतेची कामे होत नव्हती. पण मान. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या चार महिन्यात कामाचा धडाका लावत केलेली कामे व बेरोजगारांसाठी घेतलेल्या परखड भूमिकेने मी प्रेरित होऊन ढाल तलवार हाती घेतलेय असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष व नावडीचे सरपंच विवेक शेरे यांनी आपल्या समर्थकांसह काल पालकमंत्री नाम. उदय सामंत यांच्या उपस्थितीत संगमेश्वर येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश प्रवेश केला.
पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करीत जनतेचे तीन वर्षे रखडलेली विकास कामे हाती घेत करोडो रूपयांचा निधी जिल्हात आणलाय.. आता सर्वांनी एकदिलाने विकासाची कास धरून सामान्यांच्या समस्या सोडवा. असे आवाहन ना. सामंत यांनी करून प्रवेशकर्त्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी माजी आम. सदानंद चव्हाण. खाडीपट्टा भागातील खंबिर नेतृत्व म्हणून ओळख असलेले माजी जि. प. उपाध्यक्ष राजेश मुकादम. उद्योजक संदीप रहाटे हे उपस्थित होते.














