एमसीसीच्या नवीन क्रिकेट नियमांमध्ये उरणच्या नयन कट्टा यांचे योगदान

उरण दि ६ (विठ्ठल ममताबादे ) : आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट खेळाचे नियम करण्याचे व वेळोवेळी त्यात बदल करण्याचे अधिकार मेरिलेबाॅन क्रिकेट क्लब एमसीसी लंडन इंग्लंड यांना आहेत.त्यानंतर अश्या नियमांची आंतरराष्ट्रीय स्तरावर अंमलबजावणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट काँसिल (आयसीसी) कडून करण्यात येते.ऑक्टोबर 2022 मध्ये मेरिलेबाॅन क्रिकेट क्लब (क्रिकेट नियम बनविण्याचा अधिकार असलेली जागतिक संघटना) लंडन, इंग्लंड यांनी क्रिकेट नियमांच पुस्तक प्रकाशित केले आहे. या 2022 आवृत्ती मध्ये फलंदाजाचा अधिकार,डेड बाॅल,रन आउट या तीन नियमातील बदल उरण- जिल्हा रायगडचे नावाजलेले प्रशिक्षक व क्रिकेटपट्टू नयन कट्टा यांनी एमसीसीला केलेल्या सूचनेप्रमाणे केले आहेत.

नयन कट्टा यांनी क्रिकेट स्पर्धा विषयी केलेले सूचना हे जागतिक स्तरावर मान्य करण्यात आले आहे.हि गोष्ट केवळ रायगड वासींयासाठी नव्हे तर सर्व भारतीयांना अभिमानास्पद आहे. नयन कट्टा हे रायगड जिल्ह्यासाठी ८० व ९० च्या दशकात क्रिकेट खेळले आहेत.सध्या उरण येथे प्रोफेशनल क्रिकेट प्रशिक्षक म्हणून युवा क्रिकेट खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत. नयन कट्टा यांनी एमसीसीला दिलेल्या योगदाना बद्दल एमसीसीच्या क्रिकेट लाॅ कमिटीचे सदस्य जाॅनी सिंगर यांनी स्वतः नयन कट्टा यांना मेल पाठवून केलेल्या योगदानाबद्दल प्रशंसा केली व आभार मानले आहेत. हिंदू कॉलनी, म्हातवली, उरण येथे राहणारे नयन कट्टा यांचे रायगड जिल्ह्यातील सर्व स्तरातील क्रिकेट प्रेमींनी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE