अलिबाग, दि.14 (जिमाका) : राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दि.15 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता
हेलिकॉप्टरने आर.सी.एफ कॉलनी, कुरुळ, अलिबाग, जि.रायगड येथे आगमन व मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे आगमन.
दुपारी 1.15 वाजता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक, स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग.
दुपारी 2 वाजता, पत्रकार परिषद, स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग.
दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,रायगड-अलिबाग येथून आर.सी.एफ कॉलनी, कुरुळ, ता. अलिबाग, जि. रायगडकडे प्रयाण.

दुपारी 2.45 वाजता आर.सी.एफ कॉलनी, कुरुळ, ता.अलिबाग जि. रायगड येथून हेलिकॉप्टरने पाली, ता.जि. रत्नागिरीकडे प्रयाण.














