

शिवसमर्थ परिवर्तन आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन
उरण दि १५ (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून पागोटे ग्रामपंचायत 2022 सार्वत्रिक निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर 1 सरपंच व 9 ग्रामपंचायत सदस्य पदासाठी पागोटे गावातील राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत शिवसमर्थ परिवर्तन आघाडी स्थापन करून निवडणूक लढवित आहेत. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यासाठी उभे असलेले उमेदवार हे स्वच्छ चारित्र्यसंपन्न व प्रामाणिक उमेदवार आहेत.त्यांना समाजाप्रती तळमळ आहे. गावच्या सर्वांगीण विकासा साठी या शिवसमर्थ परिवर्तन आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून दया, असे आवाहन पागोटे गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील यांनी केले.
शिवसमर्थ परिवर्तन आघाडीच्या वतीने पागोटे ग्रामपंचायत निवडणूक 2022 पार्श्वभूमीवर दि 14/10/2022 रोजी सायंकाळी 6:30 वाजता श्रीगणेश हनुमान मंदिर पागोटे येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी मनोहर पाटील बोलत होते. तत्पूर्वी दुपारी 4 वा. प्रत्येक वार्डमधून शिवसमर्थ परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचार केला. त्यानंतर 6:30 वाजता प्रचारसभेला सुरवात झाली.
सरपंच पदासाठी उभे असलेले उमेदवार कुणाल अरुण पाटील (निशाणी कपबशी) यांनी शिवसमर्थ शब्दांचा अर्थ सांगत पागोटे ग्रामपंचायत निवडणूक 2022 मध्ये 18 तारखेला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूका मध्ये शिवसमर्थ परिवर्तन आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. एका उमेदवाराला नव्हे तर सर्व उमेदवारांना निवडून द्या तरच गावचा विकास करणे शक्य होईल. असे सांगत शेवटपर्यंत सर्व जनतेने शिवसमर्थ परिवर्तन माघाडीच्या सर्व उमेदवारांना साथ दया. त्यांना निवडून आणा. असे आवाहन कुणाल पाटील यांनी केले.आपल्या भाषणातून कुणाला पाटील यांनी गावच्या विकासाबाबत खेद व्यक्त केला.कुणाल पाटील म्हणाले की द्रोणागिरी सीएफएस ,डी आर टी तसेच अनेक कंपन्या बंद पडल्या मात्र या बंद पडलेल्या कोणत्याही कंपन्या चालू करण्याचे काम कोणत्याही सदस्याने केले नाही,. गावात विकासाच्या नावाने फक्त गप्पा मारण्यात आले. जनतेची फसवणूक व दिशाभूल करण्याचे काम आजपर्यंत ग्रामपंचायतच्या सदस्यांनी केलेले आहे. गावच्या विकासासाठी कोणीही प्रामाणिक प्रयत्न केलेले दिसत नाही.बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत. विविध समस्या मोठ्या प्रमाणात आहेत.मी कोणावरही वयक्तिक टीका करणार नाही. मात्र निवडून आल्यानंतर मी गावच्या विकासासाठी मी 100% प्रयत्न करेन. गावचा चेहरा बदलेन, वयाने मी लहान असलो तरी कामांच्या माध्यमातून मी माझी उंची दाखवण्याचा प्रयत्न करेन.मला एक संधी द्या. शिवसमर्थ परिवर्तन आघाडीच्या या सर्व उमेदवारांना निवडून येण्याची संधी दया. तुमचे मत म्हणजे तुमचा आशीर्वाद , तुमचे मत म्हणजे विकासाला साथ असे सांगत सर्वांना निवडून देण्याचे आवाहन कुणाल पाटील यांनी केले.














