जिल्हा परीट सेवा संघातर्फे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परीट सेवा संघ रत्नागिरी तर्फे २० डिसेंबर २०२२ रोजी श्री संत गाडगेबाबा ३२ वा पुण्यतिथी कार्यक्रम श्री विठ्ठल मंदिर, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे. समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
यानिमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत. २० डिसेंबर रोजी सकाळी ९ ते १० वाजता संत गाडगे बाबा मूर्ती पूजा आणि आरती, सकाळी ११ वाजता ते दुपारी १२ वाजेपर्यंत भजन, दुपारी १ ते २ वाजता खिचडी प्रसाद, सायंकाळी ३ ते ५ वाजता समाज मेळावा, सायंकाळी ५ ते ६ वाजता महिला मंडळ हळदी कुंकू, सायंकाळी ६ ते ७ वाजता भजन, रात्री८ वाजता आरती आणि कार्यक्रमाची सांगता होणार आहे.














