संध्याकाळी मुंबईत, रात्री जेवायला रत्नागिरीत ; आज धावणार सुपरफास्ट ट्रेन!

रत्नागिरी : दिवसभर मुंबई फिरून, मुंबईत ऑफिसची कामे आवरून संध्याकाळी कोकणात निघायचंय तर आज तुमच्यासाठी एक विशेष सुपरफास्ट ट्रेन धावणार आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पनवेलला असलेली ही ट्रेन चिपळूण रात्री ८.१० ला तर रत्नागिरीला ९ वाजून ५० मिनिटांनी तुम्हाला घेऊन येणार आहे.


मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कन्याकुमारी अशी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन (01461)आज दुपारी (दिनांक 22 डिसेंबर रोजी ) ३.३० वाजता सी एस एम टी येथून सुटेल आणि शुक्रवारी रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी ती कन्याकुमारीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (01462) कन्याकुमारी येथून दिनांक 24 डिसेंबर 2022 रोजी मुंबईसाठी सुटेल. ही गाडी कन्याकुमारी हुन दुपारी सव्वा दोन वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजता ती मुंबईतील सीएसएमटीला पोहोचेल.


आज ( गुरुवारी) दुपारी धावणाऱ्या या गाडीने तुम्हाला कोकण सुपरफास्ट गतीने गाठणे शक्य होणार आहे. मुंबई दिवसभराचे काम आवरून रात्रीचे जेवायला कोकणात यायचं म्हटलं तरी तुम्ही या गाडीने येऊ शकणार आहात. ही गाडी पनवेल ला 4.55, चिपळूण आठ वाजून दहा मिनिटांनी रत्नागिरीला रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी येईल. या गाडीने तुम्हाला कणकवलीला रात्री ११.३० वाजता तर सिंधुदुर्ग स्थानकावर रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचता येणार आहे.

कोकण रेल्वे मार्गे धावणारी ही सुपरफास्ट स्पेशल गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, मडगाव, कारवार, उडपी हे थांबे घेत एरनाकुलम मार्गे कन्याकुमारीला जाणार आहे. ही गाडी 20 डब्यांची गाडी धावणार आहे

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE