राज्य पोलिस स्पर्धेत रत्नागिरीचा अचूक ‘नेम’

राकेश कदम यांना तीन पदके ; एका सुवर्णसह 2 रजत पदके

रत्नागिरी : 33 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस स्पर्धा 2022- 23 या पुणे येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलिसांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये पुणे शहर येथे पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत राकेश कदम यांनीही सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेमध्ये नेमबाजी प्रकारामध्ये त्यांनी वैयक्तिक एक सुवर्णपदक व दोन रजत पदके प्राप्त केली आहेत. राकेश कदम हे मूळचे रत्नागिरीचे आहेत.


राकेश कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पुणे शहर दलाला नेमबाजी मध्ये ओव्हर ऑल बेस्ट तीन ट्रॉफी मिळाल्या आहेत. सदर स्पर्धेच्या ट्रॉफी या मा.देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते देऊन त्यांना गौरविण्यात आले. सदर वेळी मा. रजनीश शेठ पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. रितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर , मा. विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड , मा. संदीप कर्णिक पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. जालिंदर सुपेकर अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन पुणे शहर हे उपस्थित होत़े. सदर स्पर्धेमध्ये त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी त्यांचे तसेच मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
तसेच महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धा 2022- 23 यामध्येही राकेश कदम यांनी कास्य पदक प्राप्त करून पुणे शहर पोलीस दलाचे व महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करून नावलौकिक संपन्न केला आहे.
सन 2022 -23 मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य खुल्या नेमबाजी स्पर्धेमध्ये देखील त्यांनी एक रजत पदक व कांस्यपदक प्राप्त केले आहे.


सन 2020 मध्ये राकेश कदम यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमधील पिस्टल शूटिंग या प्रकारातील पहिले पदक प्राप्त करून दिले आहे. सध्या राकेश कदम हे भारतीय नेमबाजी संघाच्या निवड चाचणी स्पर्धे करता पात्र होऊन निवड चाचणी स्पर्धा खेळत आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल महाराष्ट्र पोलीस दलातर्फे त्यांचे कौतुक केले जात आहे व त्यांना शुभेच्छा देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र पोलीस दलाचे नावलौकिक करण्यसाठी त्यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून शुभेच्छा देण्यात देण्यात आल्या आहेत. श्री राकेश कदम हे पुणे शहर पोलीस दलामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. रक्ष कदम हे मूळचे रत्नागिरीचे आहेत. राकेश कदम यांनी यापुर्वी रत्नागिरी , पुणे ग्रामीण, विशेष सुरक्षा विभाग या ठिकाणी कर्त्तव्य बजावताना गुन्हेगारांवर वचक निर्माण करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. राकेश कदम यांनी आत्तापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत एकूण आठ सुवर्णपदके चार रजत पदके व तीन कांस्यपदके प्राप्त केली आहेत .

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE