सोलापुरातील उजनी धरणाचा कालवा फुटला

लगतच्या शेतीमध्ये पाणी घुसून नुकसान

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात पाटकुल गावानजीक उजनी धरण्याचा उजवा कालवा कुठल्या ची माहिती मिळते आहे. कालवा फुटल्यामुळे आजूबाजूच्या शेतांमध्ये पाणी शिरल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळतात पाटबंधारे खात्याचे अधिकारी यंत्रणेसह घटनास्थळी रवाना झाले आहेत.
हा कालवा 112 किलोमीटर लांबीचा आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास कालवा फुटला. फुटलेल्या कालव्यात 500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता.

शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या ऊस, द्राक्ष तसेच डाळिंब पिकाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी या भागाची पाहणी करून उपाययोजना सुचवल्या आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE