दिव्यांगांसाठी विद्यापीठ स्थापनेच्या हालचालींना वेग

स्थापनेसाठी समिती गठीत करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठित करण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

अमरावती जिल्ह्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात स्वतंत्र दिव्यांग  विभाग स्थापन करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला आहे. दिव्यांग बांधवांच्या शैक्षणिक सोयीसाठी राज्यात स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून या विद्यापीठाच्या कामाला गती यावी. त्यासाठी समिती गठित करण्यात येईल, अशीही माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील दिली.

यावेळी आमदार बच्चू कडू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव अजित बाविस्कर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE