रत्नागिरीत शेकडो ‘उबाठा’ शिवसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश
रत्नागिरी : ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून अनेक शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
गुरुवारी सायंकाळी उशिराने पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी ना. उदय सामंत यांनी पक्षांतर केलेल्या कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. विधानसभेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असताना उबाठा गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
रत्नागिरी येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात तन्वी जमादार, साहिल पठाण, अजीम चिकटे, रिजवान मुजावर, अनिस यांच्या पुढाकाराने उबाठा शिवसैनिक जकी खान, रशीद काजी, फरहान कादरी, मुबारक कादरी, नवीन मुल्ला, फकी जमादार, महबूब मुल्ला, सरजील भट्टीकडे, मुझिम जमादार, समीर कादरी, मंझूर शेख, कौसर खान, सुफियान कादरी, शब्बीर खान, असिफ खान, सुभान शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांनी उदय सामंत यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला.