https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

Konkan Railway | दिवा-रत्नागिरी मेमू ट्रेन २ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार!

0 106

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी दिवा ते रत्नागिरी मार्गावर प्रथमच सुरू करण्यात आलेल्या मेमू स्पेशल गाडीच्या फेऱ्या दि. 2 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरू राहणार आहेत. संपूर्णपणे अनारक्षित असलेल्या या गाडीमुळे मुंबईकडे जाताना आणि तेथून रत्नागिरीकडे येताना कन्फर्म तिकीट न मिळालेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

नियमित गाड्यांसह यापूर्वी जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे गणपती उत्सवातील आरक्षण फुल्ल झाल्यामुळे मध्य रेल्वेने यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी गणपती स्पेशल गाड्यांच्या शेकडो फेऱ्या जाहीर केल्या. यानुसार 2023 मधील गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीपर्यंत प्रथमच मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येत आहे. याआधी गणेशोत्सवात डेमू तसेच मेमू स्पेशल गाडीचा प्रयोग चिपळूणपर्यंतच करण्यात आला होता. त्यापुढे मेमू स्पेशल गाड्या चालवल्या जात नव्हत्या. मात्र, यावर्षीच्या गणेशोत्सवात कोकण रेल्वे तसेच मध्य रेल्वेकडून दिवा ते रत्नागिरी मार्गावर प्रथमच मेमो स्पेशल गाड्या चालवल्या. दिनांक 13 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत रत्नागिरी स्थानकापर्यंत प्रथमच मेमू स्पेशल गाडी धावत आहे.

मेमू स्पेशल गाडीसह कोकण रेल्वे मध्य रेल्वेच्या सहयोगाने गणेशोत्सवासाठी गणपती विशेष गाड्यांच्या शेकडो फेऱ्या जाहीर केल्या आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोकणवासीयांना यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुरेपूर गाड्या सोडल्या जातील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार रेल्वेने गणेशोत्सवातील याआधी च्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या गणेशोत्सवासाठी गणपती स्पेशल गाड्यांच्या आणखी फेऱ्या जाहीर केल्या आहेत.

यंदा प्रथमच दिवा ते रत्नागिरी मार्गावर धावणारी मेमू स्पेशल गाडी 01153/01154 या क्रमांकासह धावणार आहे. दि. 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत या गाडीच्या 39 फेऱ्या होणार आहेत. ही गाडी रोज धावणार आहे. सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी ही गाडी दिवा स्थानकातून रत्नागिरीला ती दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दुपारी तीन वाजून 40 मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी ती दिवा जंक्शनला पोहोचेल.

दिवा- रत्नागिरी मेमू स्पेशल गाडीचे थांबे

ही गाडी रोहा, माणगाव, वीर, सापे वामने, कारंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, कडवई संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबे घेते. यंदाच्या गणेशोत्सवात रत्नागिरी पर्यंत प्रथमच धावणाऱ्या गणपती स्पेशल मेमू गाडीला एकूण बारा डबेजोडण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.