कोकण रेल्वे मार्गावर १० व १२ ऑक्टोबर रोजी ३ तासांचा ‘मेगाब्लॉक’
पाच गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर कडवई तसेच रत्नागिरी सेक्शन दरम्यान दि. १० ऑक्टोबर रोजी तर मडगाव ते कुमटा या सेक्शन दरम्यान दि. १२ ऑक्टोबर २०२३ रोजी तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कडवई ते रत्नागिरी दरम्यान दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजून 40 मिनिटांपासून 10 वाजून 40 मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
दिनांक 12 ऑक्टोबर रोजी मडगाव ते कुमठा सेक्शन दरम्यान सकाळी 11 ते दुपारी दोन या तीन तासांच्या कालावधीत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
या गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम
१) 10 ऑक्टोबर च्या मेगा ब्लॉकमुळे 19 577 तिरुनेलवेली ते जामनगर ही दि. 9 ऑक्टोबर 2023 रोजी प्रवास सुरू होणारी गाडी ठोकर ते रत्नागिरी दरम्यान तीन तास रोखून ठेवली जाणार आहे.
२) 16346 ही मुंबईकडे जाणारी नेत्रावती एक्सप्रेस जिचा प्रवास प्रत्यक्ष 9 ऑक्टोबर रोजी सुरू होतो ती गाडी ठोकर ते रत्नागिरी दरम्यान एक तास 30 मिनिटे थांबवून ठेवली जाईल.
३) मेगा ब्लॉक मध्ये दिनांक 10 ऑक्टोबर रोजी मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस (12051) खेड ते चिपळूण दरम्यान 20 मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.
१२ ऑक्टोबरच्या मेगा ब्लॉकचा परिणाम होणाऱ्या गाड्या
१) मेगा ब्लॉकमुळे मंगळूर सेंट्रल ते मडगाव दरम्यान धावणारी विशेष गाडी (06602) ही गाडी मंगळुरू ते कुमटा यादरम्यान चालवली जाईल. पुढे कुमटा ते मडगाव दरम्यान ती रद्द केली जाईल.
२) मडगाव ते मंगळूर दरम्यान धावणारी विशेष गाडी (06601) कुमटा ते मंगळूर अशी चालवली जाईल. मडगाव ते कुमठा दरम्यान ही गाडी रद्द केली जाईल.