कुनो : नामीबिया देशातून भारतात आणलेल्या आणि कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलेला चित्ता रविवारी सकाळच्या सुमारास जंगलालगत असणाऱ्या एका गावातील शेतामध्ये गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आता याच्यात त्याला अभयारण्यात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलेला चित्ता रविवारी सकाळी वनाजवळच्या एका गावातील शेतामध्ये गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या चित्त्याला वनात परत आणण्याचे वन खात्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे .गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नामिबियामधून आणलेले आठ चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये आहेत. त्यापैकी ओबान हा चित्ता जंगलापासून साधारण १५-२० किलोमीटर अंतरावर बरोडा गावाजवळील शेतामध्ये भरकटल्याचे सांगण्यात आले.
गेल्याच महिन्यात या चित्त्याला मुक्त अधिवासात सोडण्यात आले होते अशी माहिती शेवपूर विभागीय वनाधिकारी पी. के. वर्मा यांनी दिली. चित्त्याला लावण्यात आलेल्या कॉलर उपकरणावरून त्याच्या हालचालींचा माग घेतला जातो. तो शनिवारी रात्री गावाच्या दिशेने गेल्याचे या उपकरणाने घेतलेल्या नोंदीवरून आढळले. रविवारी तो एका जागेवर बसून होता. पोलिसांचे एक पथक त्याच्या हालचालीवर नजर ठेवून आहे आणि ग्रामस्थांना दूर ठेवले जात आहे. चित्त्याला जंगलात परत पाठवण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत.















