‘प्र. ल.’ माहितीपट उद्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर

ज्येष्ठ नाटककार कै. प्र. ल. मयेकर यांच्या आठवणींना उजाळा

रत्नागिरी : ज्येष्ठ नाटककार कै.प्र.ल.मयेकर यांच्या जन्मदिनानिमित्त उद्या दि.४ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता समर्थ रंगभूमी रत्नागिरी निर्मित ‘प्र.ल.’ हा माहितीपट दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारीत होणार आहे.हा माहितीपट चौथ्यांदा दूरदर्शनवर प्रसारित होत आहे.

ज्येष्ठ नाटककार कै.प्र.ल.मयेकर यांच्या नाट्यविषयक कारकिर्दीवर आधारित हा माहितीपट आहे.या माहितीपटाचे संकल्पना आणि लेखन दुर्गेश आखाडे यांनी केले आहे.माहितीपटाचे निवेदन अभिनेते अविनाश नारकर,प्रमोद पवार आणि अभिनेत्री मयुरा जोशी यांनी केले आहे.दिग्दर्शन श्रीकांत पाटील आणि दुर्गेश आखाडे यांचे असून छायाचित्रण अजय बाष्टे यांनी केले आहे.संकलन धीरज पार्सेकर यांचे आहे.


‘प्र.ल.’ यामाहितीपटात ज्येष्ठ नाटककार कै.प्र.ल.मयेकर यांच्या सोबत काम केलेले अनेक दिग्गज कलाकार पहायला मिळतात.त्यामध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहनी,अभिनेते अरूण नलावडे,चिन्मय मांडलेकर,निर्माते प्रसाद कांबळी,पटकथाकार कै.कांचन नायक,अभिनेत्री ऐश्वर्या नारकर,शीतल शुक्ल,माधवी जुवेकर
डॉ.रवी बापट,पद्मश्री वाघ आणि विशाखा सहस्त्रबुध्दे यांचा समावेश आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE