मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
फोर्ब्स’ने मंगळवारी जारी केलेल्या 2023 च्या अब्जाधीशांच्या यादीत ही माहिती दिली. मुकेश अंबानी 83.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तर ते जगातील 9 व्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत.
गौतम अदानी 47.2 अब्ज डॉलर्स संपत्तीसह श्रीमंतांच्या जागतिक यादीत 24 व्या स्थानावर घसरण झाली आहे.
















