रत्नागिरी : रेल्वे पोलीस आणि कर्मचारी यांच्या प्रसंगावधाने रेल्वे प्रवाशी याच्या बॅगमधून पैसे आणि मोबाईल चोरणाऱ्या एका अट्टल चोराला काही क्षणात पकडण्यात यश आले. कोकण रेल्वेच्या या कर्मचारी यांचे कौतुक होत आहे. आज शुक्रवारी 10 वाजता ही घटना रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे घडली. या घटनेतील चोरट्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
नारायण आप्पा रेडकर राहणार जैतापूर सध्या डोंबिवली हे प्रवासी तुतार एक्स्प्रेसमधून रत्नागिरी स्थानकात उतरले रेडकर यांची मोटार सायकल दुसऱ्या ट्रेनने येणार असल्याने ते प्रवाशी रूम मध्ये विश्रांती घेत होते.9 वाजता च्या सुमारास वेटींग्ज रूम मध्ये रेडकर यांची बाजूला असलेली बॅग त्या चोरट्यांने काही क्षणात लंपास केली रेडकर यांना बॅग बाजुला नसल्याचे कळताच त्यांनी तातडीने पार्सल कर्मचारी आणि स्थानक अधीक्षक श्री कोवे आणि रेल्वे पोलीस यांना माहिती दिली.
स्टेशन अधीक्षक यांनी तातडीने रेल्वे पोलीस यांना चोरी ची माहिती दिल्यावर सीसी टीव्ही फुटेज वरून रेल्वे पोलीस दीपक करगुडे यांनी त्या चोरट्या चा चेहरा लगेच ओळखला आणि समोर जाणाऱ्या चोरट्याला शिताफीने पकडले तो ट्रेन केव्हा आहे याची चौकशी रेल्वे पोलीस यांच्या कडे करत होता. ती बॅग लंपास करून स्टेशन आवारातच त्या बॅग तीळ मोबाइल आणि पॅसें तिकीट चोरले होते आणि बॅग बाजुला टाकून ठेवली होती. ते पैसे आणि मोबाईल परत रेडकर यांना देण्यात आला. श्री रेडकर यांनी स्टेशन अधीक्षक ,रेल्वे पोलीस आणि कर्मचारी !यांना धन्यवाद दिले. कोकण रेल्वे ची प्रतिमा उंचावण्यासाठी ही घटना बोलकी आहे.असे श्री नारायण रेडकर यांनी सांगितले.

