उरण (विठ्ठल ममताबादे ) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सेक्टर 18 उलवे काँग्रेस कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कोकण विभाग अध्यक्ष शंभो म्हात्रे, मोरवे गाव अध्यक्ष रणजित कोळी, सी देवदासन, डेव्हिस.के.ओ, आकाश भाऊ उघाडे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

