मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर नियंत्रण सुटलेल्या ट्रकने तब्बल ११ वाहनांना ठोकरले

खोपोली (रायगड ) : मुंबई पुणे दृतगती मार्गावर आज ( गुरुवारी) दुपारी बारा 12:55 मिनिटाचे सुमारास मुंबई लेन वर खोपोली एक्झिट या ठिकाणी द्रुतगती मार्गाचे काम सुरू असल्याने काही काळ वाहतूक थांबवलेली होती. त्यावेळेस पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक KA -05-3105 यावरील वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने समोर थांबलेल्या वाहतुकीमधील एकूण अकरा वाहनांना पाठीमागून ठोकर मारून अपघात केला आहे. या अपघातामध्ये एकूण सहा व्यक्ती किरकोळ जखमी झालेल्या असून त्यांना औषधोपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.


अपघात स्थळावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे.

अपघातग्रस्त वाहने खालील प्रमाणे :-

  1. MH-01-CR -1745,
  2. MH-48-AW-7114,
  3. MH -20-EY-8841,
  4. MH-12-HN-4427,
  5. MH-02-BZ-3845,
  6. MH-46-X-4269,
  7. MH-22-AN-0818,
  8. MH-01-BU-9745,
  9. MH-14-KQ-0305,
  10. MH-03-BC-6914,
  11. MH-12-TN-7520.

अपघात ग्रस्त ट्रक चा नंबर :-
KA-56-3105 च्या चालका विरुद्ध क. २७९, ३३७,३३८ IPC अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी पळुन गेला असून त्याचा शोध सुरु आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE