देवरुख (सुरेश सप्रे) : दै. ‘नवराष्ट्र’तर्फे उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिला जाणारा आदर्श नगरसेवक पुरस्कार देवरूख नगरपंचायतीचे शिवसेना (ठाकर गट) गटनेते नगरसेवक वैभव पवार यांना जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार दि. २९ एप्रिल रोजी रत्नागिरी येथील स्वा. सावरकर नाट्यगृह येथे पालकमंत्री उदय सामंत. आ. राजू साळवी. आम. भास्कर जाधव. आम. शेखर निकम. आम. योगेश कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करणेत येणार आहे.

