देवरुख (सुरेश सप्रे) : दै. नवराष्ट्र तर्फे उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील कामगिरीबद्दल दिला जाणारा आदर्श उद्योजक (व्यापारी) पुरस्कार देवरूख व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद उर्फ बाबा सावंत यांना रत्नागिरी येथील सावरकर नाट्यगृह येथे रत्नागिरीचे पालकमंत्री मा.उदय सामंत यांचेयांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी दै. नवराष्ट्रचे रत्नागिरी आवृत्ती प्रमुख प्रभाकर वाडकर आदि मान्यवर उपस्थितीत होते. पुरस्कार मिळाल्याने बाबा सावंत यांचे आम. शेखर निकम. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य चिटणीस बारक्याशेठ बने. शहर अध्यक्ष हनिफ हरचिरकर. माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने, मोहन वनकर आदिंसह अनेकांनी अभिनंदन केले..

