मुंबईत खून करून रत्नागिरीत लपलेल्या दोघांना अटक

रत्नागिरी : मुंबईत एका महिलेचा खून करून रत्नागिरीत दडून बसलेल्या दोघा आरोपींच्या मुसक्या मुंबई पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांच्या आवळल्या आहेत.

मुंबईत एका महिलेचा खून करून दोघे आरोपी रत्नागिरीत आश्रयाला असल्याची गोपनीय माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती त्याआधारे शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावून माहिती मिळवली असता हे दोघे संशयित आंबेशेत परिसरात लपल्याचे समजले होते. या दोघा संशयतांना तसेच त्यांना आश्रय देणाऱ्या घरमालकाला पोलिसांनी अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पार पडली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE