देवरुख (सुरेश सप्रे) : दै. नवराष्ट्र तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना केलेल्या कामगिरीबद्दल दिला जाणारा आदर्श नगरसेवक पुरस्कार देवरूख नगर पंचायतीचे शिवसेना (ठाकरे गट) नगरसेवक वैभव पवार यांना रत्नागिरी येथील सावरकर नाट्यगृह येथे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सामाजिक व राजकारणात काम करताना पुरस्कार प्राप्त व्यक्तीची उंची वाढते. त्यातूनच त्यांना नविन उमेद मिळते. तशीच उमेद वैभव पवार यांना मिळेल व निरपेक्ष भावनेने काम करून राजकारणासह सामाजिक कामात वेगळा ठसा उमटतील असा विश्वास ना. सामंत यांनी व्यक्त केला.
यावेळी दै. नवराष्ट्रचे व्यवस्थापक सचिन फुलपगार, आवृत्ती प्रमुख प्रभाकर वराडकर. भैरी देवस्थानचे मुन्ना शेठ सुर्वे. आदि मान्यवर उपस्थितीत होते. पुरस्कार मिळालेने वैभव पवार यांचे माजी आ. सुभाष बने. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य चिटणीस बारक्याशेट बने, माजी जिप अध्यक्ष रोहन बने, दादा शिंदे, युवा सेनेचे मुन्ना भाटकर आदिंसह अनेकांनी अभिनंदन केले.