देवरूख शहरासाठी नवीन पाणी योजनेच्या ‘डीपीआर’चे आज प्रेझेंटेशन

नागरिकांना उपस्थित राहणेचे आवाहन

देवरूख (सुरेश सप्रे) : देवरुख शहराची झपाट्याने होत असलेली वाढ आणि नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेऊन देवरूख शहरासाठी २४ तास (२४×७) पाणीपुरवठा करणारी नविन पाणी पुरवठा योजना तयार करण्यात येत आहे. सदरची योजना करताना पुढील ३० वर्षाचा देवरुख शहराचा विस्तार व पाण्याची गरज लक्षात घेऊन डीपीआर ( सविस्तर प्रकल्प अहवाल ) तयार करण्यात आला आहे. या डीपीआरचे प्रेझेंटेशन आज दि. २ मे रोजी आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय सेमिनार हॉल येथे सायंकाळी ४ वाजता. देवरुख शहरातील नागरिकांसाठी ठेवण्यात आले आहे.

यामध्ये या पाणी योजनेबद्दलची संपूर्ण माहिती नागरिकांना देण्यात येईल. तसेच नागरिकांच्या सूचना देखील लक्षात घेऊन डीपीआर मध्ये आवश्यकते बदल करण्यात येणार आहेत.

तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण या देवरुख शहरासाठीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या जडणघडणीचे साक्षीदार बनवण्यासाठी नक्की उपस्थितीत रहावे, असे आवाहन मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांनी केले आहे

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE