उरण दि 13 (विठ्ठल ममताबादे ) : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या पदयात्रेमध्ये सर्व सामान्यांचे प्रश्न समजून घेतले त्याचा परिणाम दिसू लागला आहे. कर्नाटकच्या जनतेने काँग्रेस पक्षाला बहुमत दिले. असेच परिवर्तन आगामी निवडणुकांत सुद्धा दिसून येईल, असा विश्वास काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी व्यक्त केला.
कर्नाटक तो झाँकी है दिल्ली अभी बाकी है, अशा घोषणा यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. कर्नाटकात काँग्रेस पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाचा आनंद रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वात उलवे काँग्रेस पक्ष कार्यालयात पेढे वाटून शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.


