देवरूख (सुरेश सप्रे) : साई मंदीर सांगवे येथे प्रतिवर्षीप्रमाणे रविवार दि. १४ रोजी श्री साई मंदिर, सांगवे या मंदिराचा १२वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे.
या निमित्त सामूहिक अभिषेक, सामूहिक मध्यान्ह आरती, श्री साई भंडारा, तसेच पंचक्रोशीतील जनतेसाठी मे. गिरीश ऑप्टीक्स, चेंबूर, मुंबई यांचे वतीने मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप, शिबिर ओयोजित केले आहे.
तसेच महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धा, घेणे येणार आहे. रात्रौ डबलबारी भजनाचा जंगी सामनारंगञार आहे. अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या सर्व कार्यक्रमाला मित्रमंडळींसह उपस्थित रहावे असे आवाहन
सांगवे समाज सेवा संघ, मुंबई अध्यक्ष प्रदीप शेलार.व बाळोजी शेलार. यांनी केले आहे.

