वनवासी कल्याण आश्रमातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

उरण (विठ्ठल ममताबादे ) : वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र उरणच्या वतीने शनिवार दि 8 जुलै 2023 रोजी उरण तालुक्यातील विंधणेवाडी आणि केल्याचा माळ, चांदयली वाडी चिरनेर येथे वाडीवरील विद्यार्थ्यांना वह्या,पुस्तके,शालोपयोगी साहित्य पौष्टीक खाऊ,छत्री वाटप करण्यात आले. गुगलकडून इंजिनिअर मॅनेजर समीर पाटील हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी मुलांशी संवाद साधला आणि गूगलबद्दल माहिती सांगून आम्ही ही अशाच सर्वसामान्य घरातून शिकून, मेहनत करून पुढे आलो आहोत तुम्ही पण गूगलवरील उपलब्ध होणाऱ्या माहितीचा आपल्या अभ्यासासाठी उपयोग करून खूप मोठया पदावर पोहचू शकता असे सांगितले. त्यांच्या पत्नी मेघा पाटील (इंजिनिअर) यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात रोज एक तास तरी गणिताचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला.

वनवासी कल्याण आश्रमचे अध्यक्ष मनोज ठाकूर यांनी समाजातील असे चांगले घटक आपल्या मदती साठी हाकेला धावून येतात तर आपण शिकून फार पुढे गेले पाहिजे वनवासी कल्याण आश्रम सदैव अपल्या पाठीशी आहे, असे सांगितले.


सुनंदाताई वाघमारे कोकण प्रांत महिला अध्यक्ष यांनी वाडीवरील आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा सांगितला.वनवासी कल्याण आश्रमाचे सदस्य वामन म्हात्रे, केल्याचा माळ येथील सदस्य रोशन कातकरी,अपर्णा म्हात्रे,सनय पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी विंधणे वाडीवर फ्रेंड्स ऑफ नेचर संस्था चिरनेर यांचा सापांविषयी माहिती कार्यक्रम ठेवण्यात आला होता. निकेतन म्हात्रे सर्प मित्र यांनी वाडीवरील विषारी, बिन विषारी सापांबद्दल माहिती सांगितली आणि त्यांचे सापांना ओळखण्या विषयीचे गैरसमज दूर केले आणि सापांना
न मारण्याचे,आणि त्यांना साप पकडण्या साठी बोलविण्याचे आवाहन केले. केल्याचा माळ येथील मुख्याध्यापक प्रवीण सर यांनी प्रास्ताविक केले व वाडीवरील विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक अडचणी विषयी माहिती दिली आणि आपल्या कंपनीकडून भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. सौ लहासे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE