चिपळूणचे दोन युवक कुंभार्ली येथे नदीच्या डोहात बुडाले ; शोध सुरू

चिपळूण : येथील गोवळकोट भागातील कुंभार्ली येथून फिरायला गेलेल्या आठ मुलांपैकी नदीपात्रात उतरलेले दोन युवक बुडाल्याची घटना घडली आहे. बुडालेल्या या दोन्ही युवकांचा उशिरापर्यंत शोध सुरू होता.


या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार गोवळकोट रोड ता -चिपळूण येथील आठ मुले तीन दुचाकीवरून फिरण्यासाठी कुंभार्ली गावातील आशरकोंडा या नदीच्या ठिकाणी आले होते. या पैकी दोन मुले पाण्यात उतरली होती. वरच्या बाजूला पाऊस आल्यामुळे उर्वरित मुले ही झोपडीमध्ये आडोशाला उभी होती. नदीत उतरलेल्या मुलांचा बचाव बचाव असा आवाज आल्याने नदी काठावर असलेली मुले खाली आली. त्यावेळी दोन्ही मुलं जी पाण्यात होती ती बुडाल्याची त्यांच्या लक्षात आले.


पाण्यात बुडालेल्या मुलांमध्ये आतिक इरफान बेबल (वय 16 ते 17 ) व अब्दुल कादिर नौशाद लसाने (वय 17 ते 18
दोघेही राहणार चिपळूण शहर) या दोन युवकांचा समावेश आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोहणाऱ्या मुलांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. मदतीसाठी फ्लड लाईट व दोरखंडाची व्यवस्था करण्यात आली आहे. घटना घडलेल्या कुंभार्ली येथील नदीच्या डोहात बुडालेल्या मुलांचा शोध घेतला जात आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE