कांदळवनाच्या संवर्धनार्थ टोल फ्री क्रमांक जाहीर

रत्नागिरी दि. १०  : कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने जिल्हयातील नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी 1800-233-2687 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा
प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने तक्रारी स्विकारणे व तक्रारीचे निवारण होण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर टोल फ्री नंबर उपलब्ध करुन देण्याबाबतच्या सूचना नुकत्याच विभागस्तरीय बैठकीत देण्यात आल्या होत्या. कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने तसेच कांदळवनाच्या ऱ्हासाबाबत व तोडीबाबत जिल्हास्तरावर तक्रारी दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा टोल फ्री नंबर 1800-233-2687 उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कादंळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने नागरिकांच्या जर
काही तक्रारी असतील तर त्यांनी वरील नमूद क्रमांकावर संपर्क साधावा.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE