देवरूख (सुरेश सप्रे) : संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी गावात तीन वाड्यांची असलेली स्मशान शेड मोडकळीस आली होती. त्या स्मशानभूमीतील अडचण लक्षात घेऊन गावातील शिवसेना शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी सामाजिक बांधिलकेच्या भावनेतून श्रमदान करून तत्काळ दुरुस्ती करून देत ग्रामस्थ्यांची चांगली सोय केली
डिंगणीतील स्मशान शेड जीर्ण झाली होती. ही शेड दुरुस्त व्हावी, या साठी ग्रामस्थ्यांची मागणी होती. तसेच पावसाळी हंगाम असल्यामुळे तेथे कोणती ही आकस्मिक घटना झालीच तर तिथे पावसमुळे गैरसोय होऊ नये
यासाठी शिवसैनिकांनी त्याची तत्काळ तात्पुरती दुरुस्ती करून मोठी गैरसोय दूर केली आहे.


पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा प्रमुख राजेश मुकादम, तालुकाप्रमुख प्रमोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना उपतालुकाप्रमुख सुधीर चाळके डिंगणी सरपंच समीरा खान, शाखा प्रमुख विशाल कदम तंटामुक्ती अध्यक्ष भगवान खाडे. गावकर वामन काष्टे.योगेश खाडे सचिन राऊत यांच्या श्रमदानातून हे काम पूर्णत्वास गेले.
युवासेना उपतालुका प्रमुख सुधीर चाळके आणि शिवसेना शाखा डिंगणी यांच्या श्रमदानातून या कामाच्या माध्यमातून समाजाला एक चांगला संदेश दिला. शेडचे काम त्वरीत करून सोय केल्याबद्दल ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले.
