‘आयुष्मान भव’ कार्यक्रमाचा आ. महेश बालदी यांच्याहस्ते उरणमध्ये शुभारंभ

उरण दि. 14 (विठ्ठल ममताबादे ) : आयुष्यमान भव मोहिमेचा शुभारंभ महामहीम राष्ट्रपती महोदया श्रीमती. द्रोपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते बुधवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे दुपारी 12.00 वाजता राष्ट्रीय पातळीवर संपन्न झाला. या धर्तीवर राज्य शासनाने देखील आपला कार्यक्रम संपन्न होताच तालुकास्तरावरील कार्यक्रमाचा शुभारंभ ग्रामीण रुग्णालय उरण येथे आमदार महेश बालदी, विधानसभा सदस्य यांच्या व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
या कार्यक्रमास रवी शेठ भोईर , कौशिक शहा,राजू ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी उरण डॉ राजेंद्र इटकरे,इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बाबासो काळेल, ग्रामीण रुग्णालय उरण तसेच इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय येथील कार्यरत असणारे सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती व आशा कार्यकर्ती व नागरिक यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम मोठया उत्साहात व उत्तम प्रतिसादासह संपन्न झाला. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन आमदार महेश बालदी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी महेश बालदी यांचे स्वागत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बाबासो काळेल यांनी केले. तसेच मंचावरील सर्व प्रतिष्ठित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. एक अभिनव उपक्रम असा टीबी चॅम्पियन अशा दोन रुग्णांचा ज्यांनी क्षय रोगावर पूर्ण औषधोपचार घेऊन क्षयरोग वर मात केली अशा रुग्णांचा सत्कार करण्यात आला.
आजारावर मात केलेल्या विविध रुग्णांचा सत्कार समारोह या ठिकाणी आमदार महेश बालदी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच दोन असेही क्षय रुग्ण ज्यांना प्रोटीन युक्त धन्य वाटप करण्यात आले. आयुष्यमान भव मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी निश्चय मित्र म्हणून IOT( इंडियन ऑइल आदानी वेंचुरीयस लिमिटेड) या कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांचेही कौतुक व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महेश बालदी विधानसभा सदस्य यांनी अध्यक्षीय भाषण करत असताना या कार्यक्रमाचे खूप कौतुक केले.असे कार्यक्रम व्हायला पाहिजेत आणि गोरगरिबांपर्यंत या शासनाच्या सर्व योजना गेल्या पाहिजेत या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना गंभीर आजारी पडल्यास त्यांच्या पुढील उपचारासाठी आयुष्यमान हेल्थ कार्ड मधून जे शासन मान्य हॉस्पिटल निश्चित केले गेले आहेत त्या ठिकाणी पाच लाखापर्यंत विनामूल्य औषधोपचार मिळणार आहे, असे मत महेश बालदी यांनी व्यक्त केले.शासनाच्या विविध योजनांचा यावेळेस उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.याप्रसंगी आमदार महेश बालदी यांनी आवाहन केले की ज्या ज्या वेळेस तुम्हाला कोणत्याही इन्फ्रास्ट्रक्चरची किंवा अन्य कोणत्याही साधनसामुग्रीची गरज असेल तर तुम्ही माझ्याशी किंवा माझ्या कोणत्याही कार्यकर्त्या सोबत संवाद जरी साधला तरी ते काम पूर्ण होईल अशी ग्वाही देऊन पुढील तीन महिन्यांमध्ये या योजनेमधून जास्तीत जास्त नागरिकांचे आयुष्यमान हेल्थ कार्ड कसे काढले जाईल, याकडे लक्ष केंद्रित करावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर राजेंद्र ईटकरे तर आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष परदेशी हेल्थ असिस्टंट टी. एच. ओ. ऑफिस उरण यांनी केले.
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE