सावधान…! कोरोना डोके वर काढतोय!!
रत्नाागिरी जिल्ह्यात सक्रीय 9 कोरोना रुग्ण
रत्नागिरी : कोरोना संपला असे समजून नागरिक वावरत असले तरी प्रत्यक्षात तो पुन्हा डोके वर काढत असल्याचे निदर्शनास येत असल्याने सावधगिरी बाळगावी लागणार आहे. जिल्ह्यात हळूहळू कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. सलग दुसर्या दिवशी जिल्ह्यात 4 रुग्ण आढळले आहेत तर एक रुग्ण कोरोनातून बरा झाला आहे. जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 9 वर पोहोचली आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाल्याने आरोग्य यंत्रणेला आतापासूनच सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 201 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 3 तर लांजात एक रुग्ण आढळला. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 84,499 झाली आहे. गुहागर तालुक्यातील एक रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 81 ,956 झाली आहे. जिल्हाभरात आतापर्यंत एकूण 2,534 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. रत्नागिरीत 5, चिपळुणात 2 आणि लांजा, गुहागर तालुक्यात प्रत्येकी एक सक्रिय रुग्ण आहे .