पंतप्रधानांशी संवाद साधण्याचा रत्नागिरीतील दोन सरपंचांना मान !


‘जलजीवन मिशन’ योजना यशस्वीपणे राबवल्याबद्दल साधणार संवाद
रत्नागिरी : केंद्र सरकारची जलजीवन मिशन योजना यशस्वीरित्या राबविल्याबद्दल रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे तसेच नाचणे या दोन सरपंचांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि. 31 मे व्हिडिओ कान्फरन्सद्वारे थेट संवाद साधणार आहे. पंतप्रधान मोदी हे शिमला येथून या सरपंचाशी संवाद साधतील.
भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या राष्ट्रीय ध्वजांकित योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्याशी व्हिडिओ कान्फरन्सद्वारे दि .31 मे रोजी शिमला, हिमाचल प्रदेश येथून संवाद साधणार आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे तसेच नाचणे या दोन ग्रामपंचायतींनी गावात जलजीवन मिशन योजना यशस्वीरित्या राबविली आहे. याची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. पंतप्रधान दोन्ही ग्रामपंचायतींच्या सरपंचांसोबत संवाद साधून या योजनेचा गावाला मिळालेला लाभ, योजना राबविताना येणार्‍या अडचणीही जाणून घेणार आहे.
रत्नागिरी तालुक्यातील नाचणे सरपंच ऋषिकेश भालचंद्र भोंगले, कोतवडे सरपंच तुलीप लतीफ पटेल या दोन सरपंचांना पंतप्रधानांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE