उरण तालुका केमिस्ट असोसिएशन तर्फे फार्मसिस्ट डे आदिवासी वाडीवर साजरा

उरण दि 26 (विठ्ठल ममताबादे ) : दरवर्षी उरण तालुका केमिस्ट असोसिएशन तर्फे फार्मसिस्ट डे साजरा केला जातो.या वर्षी फार्मसिस्ट डे उरण तालुक्यातील आक्का देवी आदिवासीवाडीवर साजरा करण्यात आला.
हुतात्मा नाग्या कातकरी स्मृतिदिन वनवासी कल्याण आश्रम उरण तर्फे साजरा केला जातो. या कार्यक्रमा साठी 1000 चे वर आदिवासी बांधव उपस्थित असतात. या सर्व अदिवासी बांधवांना उरण तालुका केमिस्ट असोसिएशन तर्फे औषधे घेण्याविषयी माहिती देण्यात आली आणि त्यांना कृमिनाशक गोळ्या वाटप करण्यात आल्या. तसेच पुढे आदिवासी बांधवांसाठी वाड्यांवर असोसिएशनतर्फे कॅम्प आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.
अश्या प्रकारे संघटनेने समाजाविषयी बांधिलकी व्यक्त केली.यावेळी रायगड जिल्हा पदाधिकारी तसेच वनवासी कल्याण आश्रमचे अध्यक्ष मनोज ठाकूर, उरण तालुका केमिस्ट असो अध्यक्ष उमाकांत पानसरे,सचिव राजेश्वर गावंड,सदस्य,फार्मसिस्ट बाळू घालवत आणि अभिनय पाटील उपस्थित होते. उरण तालुका केमिस्ट असोसिएशन तर्फे उरण तालुक्यातील सर्व फार्मसिस्ट बंधूंचा, कर्मचाऱ्यांचा मेडिकल मध्ये जाऊन सत्कार देखील करण्यात आला.
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE