रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांची गर्दी वाढल्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या पोरबंदर कोचुवेली एक्सप्रेसला स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.
रत्नागिरी : गणेशोत्सवामध्ये कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना प्रचंड गर्दी झाली. अजूनही गावी आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू आहे. या मार्गावरील वाढलेली गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने पोरबंदर ते कोचुवेली (20910) या गाडीला दिनांक 28 सप्टेंबर च्या फेरीसाठी तर कोचूवेली ते पोरबंदर (20909) या फेरीसाठी दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी स्लीपर श्रेढीचा एक अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
