आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील पोस्टर स्पर्धेत चैत्राली खामकर प्रथम

सुयोग रहाटे द्वितीय क्रमांकाचे मानकरी

देवरुख दि. ११ : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रेड रिबन क्लब यांच्यामार्फत एड्स जनजागृतीपर पोस्टर मेकिंग(भित्तीचित्र) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या स्पर्धेचे परीक्षण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूलचे कलाशिक्षक सुरज मोहिते यांनी केले.

प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांच्या पोस्टरचा कोलाज.

या स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे:- प्रथम- चैत्राली गणेश खामकर (११वी वाणिज्य), द्वितीय- सुयोग चंद्रकांत रहाटे (द्वितीय वर्ष, बी. व्होक.), तृतीय- अक्षय शिवाजी वहाळकर (तृतीय वर्ष, विज्ञान), उत्तेजनार्थ- १. साहिल सुरेश मोवळे (प्रथम वर्ष, वाणिज्य), २. कस्तुरी महेंद्र गुरव (१२वी संयुक्त- वाणिज्य), ३. दुर्वेश प्रकाश गीते (११वी संयुक्त- वाणिज्य). पोस्टर मेकिंग स्पर्धेचे संयोजक म्हणून ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी जबाबदारी संभाळली. तर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये (कनिष्ठ विभाग) व प्रा. सुनील सोनवणे (वरिष्ठ विभाग) आणि सहकारी प्राध्यापकांनी मेहनत घेतली. सहभागी व यशस्वी विद्यार्थी तसेच आयोजक प्राध्यापकांचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी अभिनंदन केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE