देवरूख (सुरेश सप्रे ) : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर जिल्ह्य़ातील जुन्या जाणत्या पदाधिकारी यांनी एकत्र येत शरद पवार यांच्यामागे उभे राहण्याचा निर्णय घेतला. व पुन्हा नव्या जोमाने पक्ष बांधणी सुरू केली. त्याच अनुषंगाने संगमेश्वर तालुकाध्यक्षपदी जुने जाणते नेते बाबा साळवी यांची नेमणुक करण्यात आली. त्यानंतर गावागावात वाडीवस्तीवर पक्षबांधणीला सुरूवात झाली. त्याचा भाग म्हणून देवरुख शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी नीलेश अरूण भुवड नेमणूक करण्यात आली.
ही नेमणूक जयंतराव पाटील अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या मान्यतेने झालेली असून आपण पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून देवरुख शहरामध्ये पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी प्रयत्नशील रहालच असा विश्वास जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी नेमणुकीचे पत्र देत व्यक्त केला.
नेमणुकीनंतर त्याना राज्य चिटणीस सुरेश बने. जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर. माजी आम. रमेशभाई कदम. तालुकाध्यक्ष बाबा साळवी यांनी पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

आपले राजकीय दैवत आदरणीय पक्षाध्यक्ष “शरदचंद्रजी पवार ” यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तसेच खासदार मा. सुप्रीयाताई सुळे व जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सर्व नेते गण यांच्या नेतृत्वाखाली शहरामधील सर्व सहकायांना बरोबर घेऊन देवरुख शहरामध्ये पक्ष संघटना मजबुत करीन व माझेवर टाकलेला विश्वास सार्थ करीन, असे निलेश भुवड यांनी सांगितले.
