महामार्गावर नाणीज येथील अपघात
नाणीज : रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गावर नाणीज येथील निर्मलवाडी येथे बुधवारी सकाळी पेट्रोल वाहून नेणारा टँकर उलटला. अपघातानंतर टँकरमधून पेट्रोल गळती सुरू झाल्याने घबराट निर्माण झाली आहे.
बुधवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास भारत पेट्रोलियमचा पेट्रोलने भरलेला हा टँकर उलटला. त्यातून पेट्रोल गळती होत आहे. त्यामुळे घटनास्थळी तत्काळ रत्नागिरी येथील मोटार वाहन निरीक्षक कोराणे दाखल झाले आहेत. अपघातग्रस्त टँकरच्या चालकाला श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
