रोहित शर्माचे विश्वचषकातील ७ वे शतक

  • सचिनचा ६ शतकांचा विक्रम मोडीत
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जात ५५४ षटकार

(सुरेश सप्रे)

नवी दिल्ली : एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाने 50 षटकात 8 गडी गमावून 272 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताकडून रोहित शर्मा आणि इशान किशन सलामीला येत तुफान फलंदाजी करताना रोहितने प्रथम ४ षटकार मारत गेलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५५३ षटकारांचा विक्रम मोडला. तसेच विश्वचषकात सर्वाधिक ६ शतकांचा सचिन तेंडुलकरचा विक्रम ७वे शतक झळकावत मोडीत काढला.


यासह त्याने १९सामन्यात भारताकडून १हजार धावा पुर्ण करीत सचिनचा विक्रम मोडला. तसेच विश्वचषकात भारताकडून सर्वात जलद शतक(६३ चेंडूत) ठोकताना ४०वर्षापुर्वीचा कपिल देवाचा विक्रम हि मोडीत काढला आहे.
रोहीत ने आज चार विक्रम आपल्या नावावर केले..

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE