राजेश पाटील यांनी दिले अजगराला जीवनदान !

उरण दि. ११ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील चिरनेर येथील खारपाटील वेअर हाऊस मधील भोमालगत असलेल्या अगरवाल कंपनीच्या आवारात नऊ फुटाचा तसेच 18 किलो वजनाचा अजगर आढळून आला असता तेथील कर्मचाऱ्यांनी फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) संस्थेच्या हेल्पलाईनवर कॉल केला असता संस्थेचे सर्पमित्र राजेश पाटील हे सदर ठिकाणी जाऊन त्या अजगराचा रेस्क्यू केले. त्यासोबत तिथे उपस्थित असलेल्या कामगारांना सापाची माहिती दिली.
दिवसेंदिवस कमी होत चाललेली जंगले व त्यामुळे धोक्यात आलेले वन्यजीव नागरी वस्तीत दिसू लागले आहेत.असा कुठला जीव आपल्या घर परिसरात दिसला तर त्याला न मारता संस्थेच्या हेल्पलाईन वर कॉल करून त्याला वाचविण्याचा प्रयत्न करा असे आवाहन राजेश पाटील यांनी केले.
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE