नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्यामध्ये राज्यातील १९३ बसस्थानकांचे काँक्रीटीकरण करण्याकरिता सामंजस्य करार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी प्रधान सचिव (परिवहन) पराग जैन, मुख्य स्थापत्य अभियंता विद्या भिलारकर, मुख्य अभियंता राजेश झंजाड उपस्थित होते.
