लांजा : लांजा शहरात श्री लक्ष्मी बेकरीच्या माध्यमातून जिभेचे चोचले पुरविणारे, बेकरी पदार्थाचा लांजा ब्रँड जिल्ह्यात नव्हे तर महामार्गावरील पर्यटकांना ज्या ब्रँडची भूरळ घातली असे उद्यमशील परोपकारी, उद्योजक के. राजन यांचे आज रविवारी केरळ येथील त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.
लांजात गेली ४० वर्ष त्यांनी बेकरी व्यवसायात नाव कमावले. शहरातील कोणत्याही अडीअडचणीच्या वेळी मदतीला धावून येणारे शांत, सतत हसतमुख, संयमी होते .अंत्यविधी त्यांच्या केरळ येथील गावी होणार आहे. लांजात 40 वर्षांपूर्वी छोटेखानी असलेल्या बेकरी व्यवसायाचे महामार्गालगत त्यांनी बाजारात पेट्रोल पंपासमोर स्वीट मार्ट दालन उभे केले आहे. लक्ष्मी बेकरीची खाल्लेली खारी, टोस्ट भाकर वडी व फरसाण पेढे या सगळ्यांच्याच आवडत्या आठवणी आहेत. विविध उसत्व, होळी, गणपती , ईद, ख्रिसमस बर्थ डे सेलिब्रेशन असो किंवा रोजची चहाची वेळ, लक्ष्मी बेकरीने प्रत्येक प्रसंगाचा गोडवा वाढवला आहे. सर्वाधिक बेकरी पदार्थ देणारा ब्रॅंड म्हणून बेकरीने आपला ठसा उमटविला आहे.के राजन यांचा शांत, उदारवादी स्वभाव लांजा वासीयांनी त्यांना भरभरून प्रेम, दाद दिली.
सांस्कृतिक, सामाजिक चळवळीत त्यांनी सहकार्य केले गावाकडील अनेकांना त्यांनी रोजगार बेकरी युनिट उभारून दिला आहे लांजा खरेदी विक्री संघा शेजारी त्यांचे बेकरी युनिट आहे उच्च शिक्षित मुलगा ही के राजन यांना या व्यवसायात मदत करतो व्यवसायात आधुनिक पद्धतीने काम करत आहेत. सर्वांत जास्त व्हरायटी
बेकरी पदार्थांमध्ये सर्वांत जास्त व्हरायटी निर्माण केल्या आहेत. यामध्ये खारीचे प्रकार, ब्रेडचे, टोस्ट ४ क्रीमरोलचे पॅटिसचे , कुकीज (वाढदिवस केक आणि पेस्ट्रीज) असे अनेक प्रकार मिळून जवळपास 1०० हून अधिक बेकरी पदार्थ देणारा ब्रॅंड श्री लक्ष्मी बेकरी ठरला आहे.
कोरोनाच्या काळात विशेष काळजी कोरोनाच्या काळात ब्रेड, पाव, बटर, टोस्ट, खारी हे अत्यावश्यक सेवांमध्ये येत असल्यामुळे लक्ष्मी बेकरीने रात्रंदिवस काम करून हे पदार्थ लोकांपर्यंत पोचविले.
फूड इंडस्ट्रीमध्ये 40 वर्षांचा अनुभव असल्याने स्वच्छता आणि सुरक्षितता पहिल्यापासूनच होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यात आणखी काही बदल करण्यात आले होते एक उद्यमशील ,परोपकारी व्यक्तिमत्त्व हरपल्याने लांजा तालुका व्यापारी संघटनेने तीव्र दुःख व्यक्त केले आहे
