राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या स्वरा साखळकरला कांस्यपदक


रत्नागिरी : राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा पुणे येथील बालेवाडी स्टेडियम मध्ये १८ ते २० जानेवारी या कालावधीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. 32 जिल्ह्यांमधून 750 खेळाडूंनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. 28 कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा खेळवली गेली. रत्नागिरीच्या एस आर के तायक्वांदो क्लबची खेळाडू स्वरा विकास साखळकर हिने नेहमीप्रमाणे आपल्या यशाची मालिका सुरू ठेवली. क्लबचे मुख्य प्रशिक्षक शाहरुख शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराने या स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली.

स्वरा ही रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेची विद्यार्थिनी असून इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहे, तिने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे.


या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार व जिल्हा अध्यक्ष व्यंकटेशराव करा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण करा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, तायक्वांडो प्रशिक्षक मिलिंद भागवत, प्रशांत मकवांना, यांनी स्वरा हिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE