रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये मालवाहतूक महसुलात मध्य रेल्वे तिसऱ्या क्रमांकावर!

मुंबई : मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२३-२४ (जानेवारी २०२४ पर्यंत) साठी रु.७६६६५.५३ कोटी इतका मालवाहतूक महसूल नोंदवला असून लोह खनिजाच्या वाहतुकीद्वारे उत्पन्न मिळवण्यात आघाडीवर आहे. जानेवारी २०२४ पर्यंतच्या वार्षिक कामगिरीच्या आधारावर मध्य रेल्वे सर्व विभागामध्ये तिसर्‍या क्रमांकावर आहे.

मध्य रेल्वेने २०२३-२४ (जानेवारी-२०२४ पर्यंत) आर्थिक वर्षासाठी (एफवाय) रू. ७६६५.५३ कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वाधिक मालवाहतूक महसूल नोंदविला गेला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीतील रु.६७९७.२३ कोटी महसुलाच्या तुलनेत हे १२.७७% अधिक आहे.

यामध्ये आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये लोहखनिजाच्या वाहतुकीतून आतापर्यंतच्या सर्वाधिक ४३८.१९ कोटी रुपयांच्या महसुलाच्या आकड्यांचा समावेश आहे जो गेल्या वर्षीच्या तुलनेत ६४.२५% अधिक आहे. हे यश नागपूर विभागातील लोहखनिजाचे प्रयत्न आणि सतत लोडिंगमुळे मिळाले आहे.

यात पुढील गोष्टींचा समावेश आहे

  • कोळसा लोडिंगमधून रु.३४२१.२२ कोटीचा महसूल जो गेल्या वर्षीच्या तुलनेत १०.९४% जास्त आहे लोडिंग सुधारण्यासाठी मुंबई आणि नागपूर विभागाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मिळाले आहे.
  • लोडिंग सुधारण्यासाठी सोलापूर आणि नागपूर विभागाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सिमेंट लोडिंगमधून ६१६.०८ कोटी रुपयांचा महसूल, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत ४३.५४% अधिक आहे.
  • लोह आणि पोलाद लोडिंगमधून रु. ५५५.८५ कोटीचा महसूल जो गेल्या वर्षीच्या तुलनेत २३.१५% जास्त आहे आणि मुंबई विभागातून लोह आणि स्टीलच्या सतत लोडिंगमुळे अधिक आहे.

जानेवारी २०२४ पर्यंतच्या वर्ष-दर-वर्ष कामगिरीच्या आधारावर मध्य रेल्वे सध्या सर्व झोनमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE