रत्नागिरी : रेल्वेकडून कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात येणाऱ्या जनशताब्दी तसेच तेजस एक्सप्रेसला जोडलेल्या पर्यटनपूरक विस्टाडोम कोचना पर्यटक तसेच प्रवाशांकडून भरभरून प्रतिसाद लाभत आहे. या डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने रेल्वेच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होऊ लागला आहे.
मध्य रेल्वे व्हिस्टाडोम कोचची लोकप्रियता – एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत सुमारे १,४७,४२९ प्रवासी मध्य रेल्वेच्या गाड्यांच्या व्हिस्टाडोम डब्यांमधून प्रवास केला आणि त्यामधून २१.९५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला
मध्य रेल्वेवरील व्हिस्टा डोम डब्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने ते लोकप्रिय होत आहेत. मुंबई-गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची चित्तथरारक दृश्ये असोत किंवा मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये असोत, काचेचे टॉप आणि रुंद खिडक्या असलेले हे डबे लोकप्रिय ठरले आहेत.
एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेच्या गाड्यांवर धावणाऱ्या व्हिस्टाडोम डब्यांची कामगिरी खालीलप्रमाणे आहे:
या कालावधीसाठी या गाड्यांची एकूण व्याप्ती १.४७ लाख प्रवाशांनी नोंदवली असून त्यातून रु. २१.९५ कोटी प्राप्त झाले.

व्यवसायानुसार: 11007/11008 मुंबई- पुणे- मुंबई डेक्कन एक्स्प्रेस ९९.५०% म्हणजेच २६,२६९ प्रवाशांसह सर्वात पुढे आहे.
त्यानंतर 12125/12126 मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस आहे. 12051/12052 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेस ९७.१३% म्हणजेच २५,६४४ प्रवासी, 12123/12124 मुंबई-पुणे- मुंबई डेक्कन क्वीन, ९४.८% २५,०३० प्रवासी आहेत. मुंबई-करमाळी- ९१.०२% म्हणजेच २४,०३१ प्रवासी असलेल्या मुंबई तेजस एक्सप्रेस आणि 12025/12026 पुणे- सिकंदराबाद -पुणे शताब्दी एक्सप्रेस ७६.७८% म्हणजेच २०,२७२ प्रवासी आहेत.
महसुलानुसार: 22119/22120 मुंबई-करमाळी-मुंबई तेजस एक्सप्रेस रू. ६.१८ कोटी उत्पन्नासह सर्वात पुढे आहे, 12051/12052 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस रू. ५.१४ कोटी उत्पन्न आहे.

12025/12026 पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्सप्रेस रू. ४.१६ कोटी, 12123/12124 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन रु.२.२९ कोटी, 12125/12126 मुंबई-पुणे एक्सप्रेस रू. २.२० कोटींचा महसूल आणि 11007/11008 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेसचा महसूल रु. १.९८ कोटी इतका आहे.
२०१८ मध्ये मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम कोच पहिल्यांदा मध्य रेल्वेवर सादर करण्यात आले. प्रवाशांच्या प्रचंड मागणीमुळे, मुंबई-मडगाव मार्गावरील दुसरा विस्टाडोम कोच दि.१५.०९.२०२२ पासून तेजस एक्सप्रेसला जोडण्यात आला.
या डब्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हे डबे मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये दि. २६.६.२०२१ पासून सुरू करण्यात आले आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन दि. १५.८.२०२१ पासून मुंबई-पुणे मार्गावरील आणखी दोन विस्टाडोम डबे डेक्कन क्वीनला जोडण्यात आले. प्रगती एक्स्प्रेसमध्ये दि. २५.०७.२०२२ पासून तसेच पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमधील एक विस्टाडोम कोच देखील दि. १०.०८.२०२२ पासून सुरू आहे.
व्हिस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट आणि पुशबॅक खुर्च्या, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स, दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे, सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट इत्यादी अनेक वैशिष्ट्ये आहेत. शेवटचा पण महत्त्वाचा भाग म्हणजे व्ह्यूइंग गॅलरी आहे.
