कोमसापतर्फे द्रोणागिरी येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न

उरण दि १९ (विठ्ठल ममताबादे ) : युवा कवी, जेष्ठ कवी यांना योग्य व्यासपीठ मिळावे, नागरिकांना जनतेला कवितेची गोडी लागावी. कविता विषयी समाजात जनजागृती व्हावी, या अनुषंगाने तसेच मधुमन कट्ट्याच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषद उरण तर्फे दि. १७ व १८ फेब्रुवारी २०२४ रोजी एस एस पाटील इंटरनॅशनल स्कूल द्रोणागिरी येथे १०० वे कवी संमेलन, राज्यस्तरीय काव्य स्पर्धा, मधुबन कट्टा गौरव दिन, मान्यवरांचा सन्मान सोहळा,वाड्मयीन पुरस्कार सोहळा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सदर राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे उदघाटन कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त रमेश किर यांच्या हस्ते झाले.कोमसाप अध्यक्ष नमिता किर, विरोधी पक्ष नेते मनपा पनवेल प्रीतम म्हात्रे ,निलेश भरत म्हात्रे, सदानंद गायकवाड,हसुराम म्हात्रे, इंडिया झिंदाबादचे अध्यक्ष रमेश थवई ,शिक्षक पतपेढी पेण चेअरमन रविंद्र पाटील,,संदेश गावंड ,विकास पाटील,साहेबराव ओहोळ,सूर्यकांत दांडेकर,सुरेश ठाकूर,सदानंद गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा संपन्न झाला.तर रायगड जिल्हा कोमसाप अध्यक्ष सुधीर शेठ, जेष्ठ पत्रकार गणेश कोळी,संजय गुंजाळ, प्रकाश राजोपाध्ये,अविनाश जंगम,चंद्रकांत गायकवाड,प्रसाद पाटील,विकास पाटील,मनोज गावंड,किशोर कडू या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण संपन्न झाले.

पद्मश्री मधुभाईंनी कोमसापच्या रूपात साहित्य क्षेत्राची असामान्य सेवा केली आहे. याच सेवेचा विचार करून मधुबन कट्ट्याचे माजी अध्यक्ष अर्जुन हंडोरे यांच्या प्रेरणेतून १७ नोव्हेंबर २०१५ रोजी कोमसाप उरण शाखेच्या मधुबन कट्टयाची स्थापना झाली. तेव्हा पासून ते आजतागायत अंखडपणे दर महिन्याच्या १७ तारखेला मधुबन कट्टा विमला तलाव उरण येथे कविसम्मेलन संपन्न होत असते. भविष्यात हा काव्यानंद देण्याचा मानस असाच चालत राहणार आहे. या काव्यानंदा सोबत मधुबन कट्ट्यावर अनेक निमंत्रित कवींचा सन्मान देखील केला जातो. उरणातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जेष्ठ मंडळींना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान देखील केला जातो.दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी आमच्या कविसम्मेलन प्रवासाला १०० महिने पूर्ण झाले आहेत. म्हणूनच या १०० व्या कविसम्मेलना निमित्त दिनांक १७ व १८ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय भव्य काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते.तसेच मधुबन कट्टा गौरव दिन, वाङमयीन पुरस्कार प्रदान आणि मान्यवरांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन देखील केले होते.

कोमसाप आयोजित सदर दोन दिवशीय कवी संमेलन तसेच मधुबन कट्टा गौरव दिन, राज्यस्तरीय काव्य स्पर्धा, पुरस्कार वितरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांना कवी, लेखक, साहित्यिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, रसिक प्रेषक, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे अशी माहिती संमेलनाध्यक्ष,रायगड भूषण,जेष्ठ साहित्यिक एल बी पाटील यांनी दिली.

संमेलन अध्यक्ष रायगड भूषण प्रा.एल.बी. पाटील,मधुबन कट्ट्याचे अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे,कोमसाप उरणचे अध्यक्ष मछिंद्रनाथ म्हात्रे,मधुबन कट्टा अध्यक्ष भ. पो. म्हात्रे, कोमसाप उरण कार्याध्यक्ष रंजना केणी, कोमसाप उरण सचिव अजय शिवकर, कोमसाप महिला प्रतिनिधी समता ठाकूर, कोमसाप जिल्हा प्रतिनिधी संजय होळकर तसेच कार्यकारिणी सदस्य – किशोर पाटील, देविदास पाटील,भरत पाटील, रमण पंडीत, अनिल भोईर, संजीव पाटील, चेतन पाटील, दौलत पाटील, मीना बीस्ट, शिवप्रसाद पंडीत,मधुबन कट्टा सदस्य यांनी सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सत्र निहाय सूत्रसंचालन शर्मिला गावंड,महेंद्र गावंड,जगदिश गावंड किशोर पाटील,संजीव पाटील,रंजना केणी,दर्शना माळी,संजय होळकर यांनी केले.तर काव्य स्पर्धेचे परीक्षण प्रा.ए.डी.पाटील,साहेबराव ठाणगे,इशान संगमनेरकर यांनी पाहिले.

स्पर्धेतील विजयी उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे :

महाराष्ट्र राज्य खुलागट
प्रथम क्रमांक -वैशाली माळी पुणे
द्वितीय क्रमांक -शिवप्रसाद पंडित उरण
तृतीय क्रमांक -सिद्धेश लखमदे मुरुड,
चतुर्थ क्रमांक -प्रदीप वडदे नेरुळ,
उत्तेजनार्थ -अनिल भोईर उरण.

राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत महाराष्ट्र कवी बंधू गटात
प्रथम क्रमांक -सुरेश शिंदे घणसोली, द्वितीय क्रमांक -सुकुमार नितोरे वरळी मुंबई, तृतीय क्रमांक -मोरेश्वर बागडे ठाणे, उत्तेजनार्थ -दत्ताराम म्हात्रे डोंबिवली, विक्रम जाधव ठाणे,

महिला भगिनी काव्य गट –
प्रथम क्रमांक-संध्या दिनकर रोहा,
द्वितीय क्रमांक-हेमाली पाटील उरण,
तृतीय क्रमांक -स्वप्नाली देशपांडे बेलापूर
उत्तेजनार्थ -अक्षदा गोसावी, पनवेल
उत्तेजनार्थ -रेखा कुलकर्णी पुणे.

रायगड कवी बंधू गट
प्रथम क्रमांक -अजय भोईर पेण,
द्वितीय क्रमांक -नागेश नायडू गोरेगाव, मुंबई.
तृतीय क्रमांक -प्रवीण शांताराम, पनवेल.
उत्तेजनार्थ -भरत पाटील, उरण
उत्तेजनार्थ -मिलिंद कांबेरे मोहोपाडा.

जीनवगौरव पुरस्कार – कोकण ज्ञानपीठ विद्यालय प्राचार्य शामा सर,एन आय स्कूल प्राचार्य एल एम भोये सर, वीर वाजेकर फुंडे विद्यालय प्राचार्य डाॅक्टर प्रल्हाद पवार,ह.भ.प.भालचंद्र म्हात्रे.
विशेष सन्मान – जलतरणपट्टू मयंक म्हात्रे,चित्रकार प्रकाश पाटील,शाॅर्ट फिल्म मेकर तेजस पाटील,मिस महाराष्ट्र श्वेता राजकुमार.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE