https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

कथक नृत्य आधारित ‘नृत्यचक्र’चे आज पुण्यात आयोजन

0 259

पुणे : नृत्यचक्र हा कथक नृत्यावर आधारित एक भव्य दिव्य असा आगळावेगळा कार्यक्रम येत्या 25 फेब्रुवारीला सायंकाळी चार वाजता पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील तब्बल वीस शहरांमधील सुमारे बाराशे कथक नृत्यांगना यामध्ये एकत्रितरित्या नृत्य संरचना सादर करणार आहेत. अतिशय छोट्या छोट्या खेडेगावांमधून, शहरांमधून येणाऱ्या या कथक नृत्यांगना ‘पुण्यामध्ये‘ नृत्य प्रस्तुती करण्यासाठी उत्सुक आहेत.

नृत्यचक्र या कार्यक्रमाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये कथक नृत्याचे नाव नोंदविले जावे यासाठी हा एक प्रयत्न आहे. या कार्यक्रमाची मूळ संकल्पना कथक नृत्यांगना श्रीमती अस्मिता ठाकूर आणि श्रीमती ज्योती मन्सुखानी यांची आहे. तसेच श्रीमती तेजस्विनी साठे, डॉक्टर माधुरी आपटे आणि श्रीमती रसिका गुमास्ते यांचाही यात सक्रिय सहभाग आहे. श्री अमोद कुलकर्णी यांनी नृत्यचक्रसाठी संगीताचे विशेष आयोजन केलेले आहे.

पुण्यातील सर्व दिग्गज गुरु या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये रास नृत्यालयाच्या जवलापास 25 विद्यार्थिनींचा तर गुरु सौ. रुपाली लिमये, गुरू सौ.धनश्री मुरकर, गुरु सौ. सौख्यदा वैशंपायन, गुरु सौ. स्वरदा काटदरे, गुरु सौ. आसावरी आखाडे , गुरु सौ. तेजश्री भट- लिपारे , गुरु सौ.श्वेता सावंत, गुरु सौ.वर्षा गोळवलकर या व यांच्या विद्यार्थिनींचा सहभाग असून रास नृत्यलयाच्या संचालिका गुरु सौ श्रुती आठल्ये या रत्नागिरी जिल्ह्याच नेतृत्व करीत आहेत.

हा कार्यक्रम बघण्यासाठी नृत्यचक्राचे एफबी पेज आजच फॉलो करा. सर्व रसिक प्रेक्षक नृत्यचक्राच्या एफबी पेजवरून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात.
https://www.facebook.com/profile.php?id=61550225754715&mibextid=JRoKGi

Leave A Reply

Your email address will not be published.