गुहागरचे पत्रकार गणेश धनावडे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान
गुहागर : कोकणचे लोकप्रिय दैनिक ‘सागर’चे गुहागर तालुका प्रतिनिधी, गुहागर न्यूजचे संस्थापक संचालक,विविध सामाजिक संस्थांवर क्रियाशील पत्रकार श्री. गणेश अनंत धनावडे यांना शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन मुक्ताईनगर जळगाव यांच्यावतीने दिला जाणारा तापीपूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार नुकताच प्रसिद्ध बाल साहित्यिक प्रा. लिला शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराचे वितरण फोंडा- गोवा येथे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनात करण्यात आले. श्री. धनावडे हे गेली २० वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत दैनिक रत्नागिरी टाइम्स, प्रहार व सध्या दैनिक सागरमध्ये तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे व वैविध्यपूर्ण लेखण केले आहे. तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत गुहागर शाखेचे तालुकाध्यक्ष, माहितीचा अधिकार प्रचार – प्रचार संस्थेचे सचिव, शिवतेज फाउंडेशनचे खजिनदार, महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे सल्लागार, रत्नागिरी जिल्हा हौशी जुदो संघटनेवर जिल्हा उपाध्यक्ष व अन्य विविध संस्थांच्या माध्यमातून समाजोभिमुख काम केले आहे.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष रमेश वसकर, साहित्यिक प्रकाश तळवडेकर, शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण फाऊंडेशन, लेखिका डॉ. शोभा रोकडे, जयवंत आडपइकर, सुनील सावकार आदी उपस्थित होते.
गुहागर : कोकणचे लोकप्रिय दैनिक सागरचे गुहागर तालुका प्रतिनिधी, गुहागर न्यूजचे संस्थापक संचालक,
विविध सामाजिक संस्थांवर क्रियाशीलपणे काम करणारे महाराष्ट्र शासनाचे अधिस्वीकृती पत्रकार श्री. गणेश अनंत धनावडे यांना शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन मुक्ताईनगर जळगाव यांच्यावतीने दिला जाणारा तापीपूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार नुकताच प्रसिद्ध बाल साहित्यिक प्रा. लिला शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.